Viral Video: रील स्टार महिला कंडक्टरवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या

in #digras2 years ago

सध्या एका महिला कंडक्टरला कामावरून निलंबित करण्यात आल्याची घटना घडली समोर आली आहे. ऑन ड्युटी रील्स बनवल्याने या महिला कंडक्टरला कामावरून काढून टाकल्याचं समोर आलं आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचं सांगत महामंडळाने या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे.आता यावर जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया देत निलंबनाची कारवाई मागे घ्या अशी मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. सोशल मीडियावर रिल आणि व्हिडीओ बनवून अपलोड केल्याने महिला कंडक्टरचं निलंबन करण्यात आलं होतं. एसटीची प्रतिमा मलीन होत असल्याचं कारण देत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.Ankita_Khane__84_.jpg