Rishabh Pant : 'पंतला पहिली पसंती नाही', राहुल द्रविडचा खळबळजनक खुलासा

in #digras2 years ago

Rishabh Pant India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्याच सामन्यात ऋषभ पंतला पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात हाँगकाँग संघाचा 40 धावांनी पराभव केला. आता सुपर-4 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 सप्टेंबरला सामना होणार आहे. मात्र याआधी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडने ऋषभ पंत बद्दल मोठा खुलासा केला आहे.bhushan_esakal___2022_09_04T104525_818.jpg