Eknath Shinde: बिग बॉसच्या घरात CM शिंदेंच्या नावाची चर्चा; काय आहे कारण?

in #digras2 years ago

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त तरीही लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ला ओळखले जाते. २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. दरम्यान, या वादग्रस्त घरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळालेबिग मराठीमध्ये अक्षय केळकरने एंट्री केल्यानंतर त्याला महेश मांजरेकरांनी ‘आता इथंपर्यंत कसा आलास?’ असा प्रश्न केला असता. “मी बाबांच्या रिक्षातून आलोय. असे उत्तर केळकरने दिलं. तसेच, मी एक अभिनेता असलो तरी माझे बाबा आजही रिक्षा चालवतात. मी कितीही कमावत असलो तरी त्यांना रिक्षा चालवायचीच आहे असं ते सांगतात.यानंतर महेश मांजरेकर यांनी त्याच्या बाबांचं कौतुक करत अक्षयच्या वडीलांनाही मंचावर बोलावलं. यावेळी त्यांचे कौतुक करताना मांजरेकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंचेही कौतुक केले असल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेही कधी काळी रिक्षा चालवत होते...मांजेकर यांनी अक्षय केळकरच्या बाबांना प्रश्न विचारला की, “मुलगा एवढा कमावतो. आता त्याच्या करिअरमध्येही स्थैर्य आलंय मग तुम्ही रिक्षा का चालवता. आता निवृती घ्या ना. असा सल्ला दिला. यावर अक्षयचे बाबांनी, नाही मी रिक्षा चालवणं कधीच सोडणार नाही. त्याने माझं आरोग्य चांगलं राहातंय. असं उत्तर दिलं.त्यांचे उत्तर ऐकताच व्वा, कोणतंही काम उच्च किंवा कमी दर्जाचं नसतं. आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कधी काळी रिक्षा चालवत होते. त्यांचा रिक्षावाला ते राज्याचा मुख्यमंत्री हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. एक दिवस तुमचा मुलगाही खूप यशस्वी होईल. अशा शब्दात मांजरेकर यांनी बिग बॉसच्या मंचावर मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले.रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे शिवसेनेतील एक मातब्बर नेते आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हा सांभाळला. साधा रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास होत आहे. शिंदे यांचा रिक्षाचालक ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास नुसताच थक्क करणारा नाही, तर अनेकांना प्रेरणा देणारा आहे.साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचं गाव. ते शिक्षणासाठी ठाण्यात आले होते. गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. पण त्यातून मिळकत होत नव्हती. म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं 18 वर्ष. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केलाesakal_new__32_.jpg