बजेट पुन्हा बिघडलं; घरगुती गॅस वापराचा कोटा ठरला, आता वर्षभरात एवढेच सिलिंडर मिळणार

in #digars2 years ago

LPG Gas Cylinder News: LPG गॅस सिलिंडर वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने आता घरगुती गॅस सिलिंडरचा कोटा निश्चित केला आहे. आता सर्वसामान्यांना एका वर्षात फक्त १५ सिलिंडर मिळतील. सिलिंडरच्या संख्येबाबत मोठा बदल करण्यात आला असून पूर्वी तुम्हाला हवे तितके सिलिंडर बुक करता येत होते, पण आता तसे होणार नाही. जाणून घ्या काय आहेत नवीन नियम...
हायलाइट्स:
सरकारने आता घरगुती गॅस सिलिंडरचा कोटा निश्चित केला आहे.
घरगुती गॅस ग्राहकांना आता वर्षातून केवळ १५ वेळा गॅस सिलिंडर भरता येणार आहे.
याशिवाय, तुम्ही एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही.महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक धक्का बसला आहे. घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. आता नवीन नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त १५ सिलिंडर मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. त्याचबरोबर एक महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विना-अनुदान कनेक्शनधारक (Non Subsidy Connection) हवे तितके सिलिंडर घेऊ शकत होते.
तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला
वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून विभागाला अशा तक्रारी येत होत्या की, घरगुती विनाअनुदानित रिफिल व्यावसायिकांपेक्षा स्वस्त असल्याने तेथे वापरल्या जात आहेत.अनुदानित लोकांना फक्त १२ सिलिंडर
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हे बदल तिन्ही तेल कंपन्यांच्या ग्राहकांना लागू पडणार आहेत. अनुदानित घरगुती गॅससाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त १२ सिलिंडर मिळतील. तसेच यापेक्षा जास्त गरज असल्यास अनुदान नसलेले सिलिंडरच घ्यावे लागतील.

संख्या १५ पेक्षा जास्त नाही
रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर महिन्यात फक्त दोनच सिलिंडर मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात १५ पेक्षा जास्त असू शकत नाही. जर एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल, तर त्याचा पुरावा देताना त्याला तेल कंपनीच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. तरच तुम्हाला अतिरिक्त रिफिल मिळू शकेल.lpg-gas-cylinder-94522839.jpg