डायबेटिस टाइप -1 आता तीन वर्षांसाठी रोखता येणार; औषधाला मंजुरी

in #diabetes2 years ago

आजकाल अगदी कमी वयातच हे आजार होत आहेत. डायबेटिस हा गुंतागुंत निर्माण करणारा आजार मानला जातो. डायबेटिसचे निदान झाल्यावर हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी संबंधित रुग्णाला आटोकाट प्रयत्न करावे लागतात. आज डायबेटिस नियंत्रणासाठी अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर ही बातमी डायबेटिसच्या रुग्णांसाठी सकारात्मक आणि महत्त्वाची आहे. आता डायबेटिसचा धोका तीन वर्षापर्यंत रोखणं शक्य होणार आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने एका खास औषधाला नुकतीच मंजुरी दिली आहे. हे औषध डायबेटिस टाइप -1 तीन वर्षांपर्यंत रोखू शकतं.

अशाप्रकारचं हे जगातलं पहिलं औषध आहे. डायबेटिसच्या उपचारांमध्ये हे औषध महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. आता डायबेटिसचा धोका तीन वर्षांपर्यंत रोखता येणार आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने टॅप्लिझुमॅब नावाच्या एका औषधाला नुकतीच मंजुरी दिली आहे.

या औषधाच्या माध्यमातून डायबेटिस टाइप -1 तीन वर्षापर्यंत रोखता येणार आहे. अमेरिकेनंतर ब्रिटनदेखील या औषधाला मंजुरी देण्याच्या तयारीत असून, सध्या तिथं या औषधाच्या ट्रायल सुरू आहेत.n4441133321669074415332f3975e3e5ec155e633aebc0d74e8e744ed65de28aeda8157526e8c2c4caa9703.jpg