घराणेशाही संपवण्यासाठीच्या लढ्यात मला साथ द्या; PM मोदींचं आवाहन

in #dheli2 years ago

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही दोन देशापुढची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, असं म्हटलं आहे. घराणेशाही संपवण्यासाठी आपल्याला साथ देण्याचं आवाहनही यावेळी मोदींनी केलं. (Independence Day 2022)esakal_new___2022_08_15T102325_634.jpg

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आपल्या नवव्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं की, भारतापुढील सर्वात मोठी दोन आव्हाने भ्रष्टाचार आणि घराणेशाही आहेत. भ्रष्टाचार देशाला पोखरत आहे आणि घराणेशाही राजकारणातूनही संधी हिसकावून घेत आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच घराणेशाही संपवण्यासाठीच्या लढ्यात आपल्याला साथ देण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

Sort:  

Nice news sir 👍