हॉस्टेलमधील ६० तरुणींचे अंघोळीचे Video व्हायरल

in #desh2 years ago

पंजाबच्या चंदीगढ विद्यापीठातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंदीगढ विद्यापीठाच्या (Chandigarh University) मोहाली येथील मुलींच्या वसतीगृहातील सुमारे ६० मुलींचा आंघोळ करतानाचे व्हिडिओ (Viral Video) इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. यामुळे विद्यापीठातील ८ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून यातील एक मुलीची प्रकृती गंभीर आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे व्हिडिओ बनवणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून त्यांच्याच हॉस्टेलमध्ये राहणारी एक विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीने वसतीगृहातील इतर मुलीचे व्हिडिओ बनवून एका तरुणाला पाठवले, जे त्याने इंटरनेटवर व्हायरल केले आहेत. या घटनेमुळे पंजाबसह देशात खळबळ माजली आहे.
पंजाबमधील मोहाली येथील चंदिगढ विद्यापीठात काल रात्री अडीच वाजता मोठा गोंधळ झाला. मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने ६० विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून एका तरुणाला पाठवला. तरुणाने हा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणाची माहिती मिळताच वसतिगृहात राहणाऱ्या आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या आठ विद्यार्थिनींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गंभीर बाब म्हणजे चंदिगढ विद्यापीठ व्यवस्थापन हे प्रकरण दाबण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणत आहे. याबाबत कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली, मात्र कॉलेज व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. आरोपी तरुणी ही बऱ्याच काळापासून अंघोळ करताना इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवत होती आणि शिमल्यातील एका तरुणाला पाठवत होती असा आरोप आहे. या तरुणाने हे सगळे व्हिडिओ इंटरनेट टाकले, जेव्हा विद्यार्थिनींनी त्यांचे व्हायरल व्हिडिओ इंटरनेट पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला.
विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या गोंधळाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस फौजफाट्यासह विद्यापीठाजवळ पोहोचले. यावेळी पोलिसांना विद्यार्थिनींच्या रोषाचा आणि विरोधाचा सामना करावा लागला. पोलिसांनी व्हिडिओ पाठवणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतले आहे. आठ तरुणींपैकी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या गोंधळानंतर पोहोचलेल्या नातेवाईकांनीही या संपूर्ण प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.
images (22).jpeg