राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या कारला अपघात ; युक्रेन

in #desh2 years ago

युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कारला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका दुचाकीस्वारानं राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या कारला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात झेलेन्स्की यांना गंभीर दुखापत झाली असून आता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू असल्यानं हा अपघात आहे की घातपात याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
झेलेन्स्कींचे प्रवक्ते सेर्ही न्याकिफोरोव यांनी या घटनेबाबत फेसबुकवरून माहिती देताना म्हटलं आहे की, सकाळी राष्ट्रपती झेलेन्स्की हे एका कार्यक्रमासाठी जात असताना अचानक एका दुचाकीस्वारानं त्यांच्या कारला धडक दिली. त्यात त्यांना गंभीर मार लागला असून त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टरांच्या टिमनं त्यांना त्याना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आहे. याशिवाय अपघातानंतर आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही प्रशासनानं दिल्याचं न्याकिफोरोव यांनी सांगितलं.
दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरुच आहे. रशियानं युक्रेनच्या ज्या प्रांतावर ताबा मिळवलेला आहे, त्याला परत मिळवण्याचा प्रयत्न युक्रेनच्या सैन्याकडून सुरू आहे. याशिवाय या युद्धात युक्रेन आणि रशियाचे असंख्य सैनिक मारले गेले असून लाखो लोकांना देशाबाहेर विस्थापित व्हावं लागलं आहे. त्यातच आता राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कारला अपघात झाल्यानं खळबळ उडाली आहे.
6322c3bb4a057.jpg