कृषी विभाग बियाणे कंपनीच्या दावणीला

in #department2 years ago

images (4).jpeg

( मकसुद अली )

यवतमाळ : कापसाच्या बियाण्याची नमुने चाचणी साठी घेऊ नये म्हणून बियाणे कंपन्यांनी जोरदार फिल्डींग लावली. कृषी विभाग सुधा त्याला बळी पडला. त्यामुळे एचटीबीटी तपासणी साठी नामुनेच घेतले गेले नसल्याची माहिती आहे. . परिणामी नामांकित बिजी 2 चे आडून HTBT वान विकल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात 24 लाख कापशी चे बॅग लागणार , त्या दृष्टीने कंपन्यांनी तयारी केली.

त्यात देशातील कापूस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी कृषी विभागाने येच टी बी टी चे चाचणी साठी काही कापशी चे बियाणे घेतले. त्या नंतर ते प्रयोग शाळेत पाठवले असता काही कंपनी चे बियाणे येचं टी बी टी positive aale. वास्तविक पाहता हे बियाणे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याने या बियाण्यावर देशात बंदी आहे. या वर्षी तर कृषी विभागाणे कोणत्याही बियाणे कंपनीचे कापसाचे बियाणे चाचणी साठी घेतलेच नसल्याची माहिती आहे. आपले कंपनीचे बियाणे HTBT चाचणी साठी घेतल्या जाऊ नये . यासाठी कंपन्यांकडून अनेक मार्गाचा अवलंब केल्याचे बोलल्या जात आहे. H T B T चाचणी साठी नमुनेच घेतले गेले नाही. त्यामूळे शेतकऱ्यांची कोट्यवधी रू ने फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली. काही बड्या कंपनी ने जिल्हयातील बड्या कृषी विक्रेत्यांना हाताशी धरून हा गोरख धंदा बिनधास्त पणे करत असल्याचे बोलल्या जात आहे.

कापूस बियाणे HTBT चाचणी साठी घेतल्या नंतर नागपूर च्या लैब मधे चाचणी साठी पाठविण्यात येते. मात्र या वर्षी लैब कडून HTBT चाचणीसाठी नमुने स्वीकारल्या जात नसल्याचे कृषी विभागात चर्चा आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांनी कृषी विभागातील बडे अधिकारी, लैब सह सर्वच मैनेज केले का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.