Independence Day 2022 : पहिल्यांदा दिली जाणार स्वदेशी 21 तोफांची सलामी.

in #delhi2 years ago

013d2ae299194b1ef87b5c02cfe286a41660526551551322_original.pngAzadi Ka Amrit Mahotsav : आज 15 ऑगस्ट 2022, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर यंदा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास तयारी करण्यात आली आहे. यावर्षी पहिल्यांदाच स्वदेशी 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. तसेच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार असून त्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम 'एक भारत, श्रेष्ठ भारत' आहे.

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सकाळी 6.55 वाजता सुरू होईल. पहिल्यांदा लष्कराचे दिल्लीचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) यांचं आगमन होईल. यानंतर संरक्षण सचिव पोहोचतील आणि त्यानंतर तिन्ही दलांचे प्रमुख म्हणजे लष्कर, हवाई दल आणि नौदल येतील. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट ठीक 7.08 वाजता पोहोचतील आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 7.11 वाजता पोहोचतील. लाल किल्ल्यावर 7.18 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होतील. लाल किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करतील.