भगव्या रंगाच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनची झलक; 25 नव्या फिचर्ससह

in #delhilast year

image.png
भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत आता लवकरच आपल्या नव्या रुपात समोर येत आहे. आतापर्यंत देशात चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा रंग पांढरा किंवा निळा होता. पण, आता यामध्ये आणखी एका रंगाचा समावेश होणार असून येत्या काळात भगव्या रंगाच्या ट्रेन आपल्याला दिसू लागतील. चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीकडून बनवण्यात आलेली नवी ट्रेन ८ डब्यांची असून भगव्या आणि राखाडी रंगाची आहे. वंदे भारत ट्रेनवर लावण्यात आलेल्या चित्त्याच्या लोगोमध्येही बदल करण्यात आला आहे. यासह फिचर्समध्ये जवळपास २५ बदल करण्यात आले आहेत. भगव्या रंगाच्या वंदे भारत ट्रेनचा ट्रायल घेण्यात आला असून लवकरच ट्रेन लोकांच्या सेवेत येणार आहे. रेल्वेमंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली असून याचे फोटो शेअर केले आहेत. भविष्यात याच रंगातील वंदे भारत ट्रेनचे निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: UP Crime: शेजाऱ्याच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या रागातून मुस्लिम मुलाच्या आई-वडिलांची हत्या

नवे फिचर्जवंदे भारत ट्रेनच्या फिचर्समध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सीट अधिक आरामदायक करण्यात आली आहे. वॉशबेसिनची खोली वाढवण्यात आली आहे. सीटचा अँगल बदलण्यात आला आहे. चार्जिंग पॉईंटची जागा बदलण्यात आली आहे. सीटचा रंग बदलण्यात आलाय. व्हीलचेअरसाठी वेगळा पॉईंट देण्यात आला आहे. टॉयलेटमधील लाईटची तीव्रता वाढवण्यात आली आहे.