Delhi : राजपथ नव्हे, आता 'कर्तव्यपथ'; नाव बदलण्याच्या प्रस्तावाला NDMC कडून मंजुरी

in #delhi2 years ago

japth.jpgDelhi Rajpath-Kartavyapath : दिल्लीच्या राजपथचं (Rajpath) नवं नाव आता 'कर्तव्यपथ' (Kartavyapath) असं असणार आहे. आज (बुधवार) झालेल्या एनडीएमसीच्या (NDMC) बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.एकेकाळी किंग्सवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजपथाला आता कर्तव्यपथ म्हटलं जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारनं राजपथचं नाव बदलून 'कर्तव्य पथ' केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण परिसर आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधलेल्या विभागाचं उद्घाटन करणार आहेत. राजपथचं नाव बदलण्यासाठी, नवी दिल्ली नगर परिषदेनं (NDMC) आज 7 सप्टेंबरला राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचं नाव बदलून 'कर्तव्य पथ' करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नामांतर सोहळ्याच्या लक्ष्यस्थानी आता राजपथ आला आहे. राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटपर्यंत जाणाऱ्या या ऐतिहासिक मार्गाचं नाव आता ‘कर्तव्यपथ’ अर्थात कर्तव्याचा मार्ग असं करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि त्याला आज एनडीएमसीच्या बैठकीत मंजुरीही मिळालीय