Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याचं आवाहन

in #darwa2 years ago

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याचं आवाहन
Published on : 20 November 2022, 4:24 pm

By
संतोष कानडे

मुंबईः सगळं मलाच पाहिजे, या हव्यासापोटी सत्ता काबीज केली जात आहे. असा सत्तेचा हव्यास असणाऱ्यांना खाली खेचा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. शिवाजी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाचं आज लोकार्पण झालं. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसून आले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी प्रबोधनकारांचे विचार, वैदिक परंपरा आणि आजची स्थिती यावर विचार मांडले.बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे कोणी गुलामगिरीला झुगारुन स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी काम करतील, त्यांच्यासोबत आम्ही जायला तयार आहोत. सध्या सत्तापिपासू लोकांना सत्तेचा हव्यास सुटला आहे. अशा लोकांना अगोदर खाली खेचलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले