किचन क्वीन मधुरा बिग बॉसमध्ये जाणार? काय दिलं उत्तर

in #darwa2 years ago

मधुरा रेसीपी हा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ बनवायला शिकवणारा चॅनल आहे. मधुरा बाचल यांनी 2009 मध्ये मोठी झेप घेतली, त्यांनी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांना जगभर पोहचवण्यासाठी पहिले YouTube चॅनल सुरू केले. मधुराच्या मराठी YouTube चॅनेलवर 6.5 मिलीयन पेक्ष अधिक सबस्क्राइबर्स मिळवले आहेत. तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, 7 मिलीयनहून अधिक लोक मधुरा रेसिपी फॉलो करतात.

कोणतीही आयडिया नसताना ही मधुराने येवढ्या मोठ्या यशापर्यंत मजल मारली आहे. चॅनल सुरू करताना पहिला व्हिडिओ हा 'भरलं वांग' होता. आणि त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि त्या व्हिडीओला चांगल्या प्रकारे फीडबॅक मिळाला होता. या कामत कोणाचा सपोर्ट आहे असं विचारल असता त्यांनी सांगितल की. घरच्याचा चांगला सपोर्ट मिळतो,आणि अजूनही आई सपोर्ट करत असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रात महिलांसोबत पुरुषांचा देखील व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.मधुरा रेसिपी हे पहिले मराठी YouTube चॅनल होते ज्याने 6.5 मिलीयन सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला आहे. या चॅनेलमध्ये एक हजार पेक्षा जास्त रेसिपींचे व्हिडीओ आहेत. या रेसिपींचे बहुतांशी व्हिडीओ महाराष्ट्रीयन असले तरी, मधुराने आंतरराष्ट्रीय रेसिपन पासून ते देसी स्ट्रीट फूडपर्यंत तुम्ही कल्पना करू शकनार नाही. अशा सगळ्या डिशमध्ये त्यांनी व्हिडीओ बनवले आहेत. मधुरा रेसिपीचे व्हिडीओ पाहून कोणीही कधीही स्वयंपाक बनवू शकतो!