Bhediya Box Office Collection: वरूणचा 'भेडिया' हिट की फ्लॉप! बॉक्स ऑफिसवर ...

in #daily2 years ago

Bhediya Box Office Collection: वरूण धवन आणि क्रिती सॅनन स्टारर 'भेडिया' हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. स्त्री आणि बाला सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट करणारे दिग्दर्शक अमर कौशिक दिग्दर्शित 'भेडिया' ह्या ट्रेलर आल्यापासून लोकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता होती. मात्र अजय देवगणचा 'दृश्यम 2' ने मोठ्या पडद्यावर ताबा मिळवलेला असतांना 'भेडिया' बद्दल अनेक शंका होत्या. अशा परिस्थितीतही वरुण धवनचा 'भेडिया'ने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी झाला आहे. आता या चित्रपटाच्या कलेक्शनवर एक नजर टाकूया.