Board Exam 2023 दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर,या तारखेला सुरू होणार पेपर

in #daily2 years ago

Board-Exam-2023-1-1024x576.jpgBoard Exam 2023 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा होणार या तारखेला सुरू :-

मंडळाने जाहीर केलेल्या तारखेनुसार बारावीची परिक्षा 21 फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा 2 मार्चला सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.