कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, डोंबिवलीतून आठ वाजता बाहेर पडलेला नोकरदार

in #daily2 years ago

fedcbd69-3bdc-476a-b0fa-6bc7cadbc9c4.jpgडोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौका जवळील पुलाजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने मंगळवारी रात्री एका मार्गिकेत काँक्रीटीकरणाचे काम केल्याने चौका जवळील एका मार्गिकेमधून वाहनांची येजा सुरू झाली आहे. सर्वाधिक कोंडीच्या पलावा चौकातील रस्ता एक मार्गिकेचा झाल्याने सकाळी या रस्त्यावरुन येजा करणारी वाहने या मार्गिकेत अडकून पडली. डोंबिवलीतून सकाळी आठ वाजता खासगी वाहनाने बाहेर पडलेला प्रवासी सकाळी १० वाजेपर्यंत काटई नाका परिसरात अडकून पडला होता. या अभूतपूर्व वाहन कोंडीत विद्यार्थी, रुग्ण अडकून पडले आहेत.

शिळफाटा रस्ते कामाचा ठेकेदार मनमानेल तसा रस्ता खोदणे, रस्त्यात जेसीबी, पोकलेन आणून कामे सुरू करणे अशी कामे करत आहे. या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचा पर्यवेक्षक अभियंता किंवा एमएसआरडीसीचा अभियंता उपस्थित नसल्याने मजूर कामगार कोणाचेही न ऐकता काम करतात. त्याचा फटका प्रवाशांना आहे.
बसमहाराष्ट्रशहरसत्ताकारणदेश-विदेशराशीभविष्यमनोरंजनट्रेंडिंगक्रीडाऑटोतंत्रज्ञानचतुराविचारमंचविश्लेषणफोटोव्हिडिओवेब स्टोरीज

लोकसत्ता डॉट कॉमवर शोधा
होम
ई-पेपर
फोटो
ट्रेंडिंग
विचारमंच
expand
महाराष्ट्र
शहर
expand
सत्ताकारण
देश-विदेश
राशिभविष्य
expand
मनोरंजन
क्रीडा
चतुरा
लाइफस्टाइल
ऑटो
तंत्रज्ञान
विश्लेषण
व्हिडिओ
वेब स्टोरीज
ऑडिओ
अर्थसत्ता
लेख
expand
अन्य
expand
लोकप्रभा
ब्लॉग्स
RSS FEED
आमच्या विषयी
संपर्क
ENGLISHENGLISH
தமிழ்தமிழ்
বাংলাবাংলা
മലയാളംമലയാളം
हिंदीहिंदी
मराठीमराठी
BUSINESSBUSINESS
बिज़नेसबिज़नेस
INSURANCEINSURANCE
Follow us

Facebook

Twitter
स्वातंत्र्य दिन
एकनाथ शिंदे
अजित पवार
आदित्य ठाकरे
देवेंद्र फडणवीस
मुकेश अंबानी
शिवसेना
उद्धव ठाकरे
गोष्ट पुण्याची
HOME
THANE
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, डोंबिवलीतून आठ वाजता बाहेर पडलेला नोकरदार १० वाजेपर्यंत काटई नाक्यावरच
या अभूतपूर्व वाहन कोंडीत विद्यार्थी, रुग्ण अडकून पडले आहेत.

Written by लोकसत्ता टीम
August 17, 2022 12:27:50 pm

major traffic jam at Shilphata
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी , डोंबिवलीतून आठ वाजता बाहेर पडलेला नोकरदार १० वाजेपर्यंत काटई नाक्यावरच

डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौका जवळील पुलाजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने मंगळवारी रात्री एका मार्गिकेत काँक्रीटीकरणाचे काम केल्याने चौका जवळील एका मार्गिकेमधून वाहनांची येजा सुरू झाली आहे. सर्वाधिक कोंडीच्या पलावा चौकातील रस्ता एक मार्गिकेचा झाल्याने सकाळी या रस्त्यावरुन येजा करणारी वाहने या मार्गिकेत अडकून पडली. डोंबिवलीतून सकाळी आठ वाजता खासगी वाहनाने बाहेर पडलेला प्रवासी सकाळी १० वाजेपर्यंत काटई नाका परिसरात अडकून पडला होता. या अभूतपूर्व वाहन कोंडीत विद्यार्थी, रुग्ण अडकून पडले आहेत.

शिळफाटा रस्ते कामाचा ठेकेदार मनमानेल तसा रस्ता खोदणे, रस्त्यात जेसीबी, पोकलेन आणून कामे सुरू करणे अशी कामे करत आहे. या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचा पर्यवेक्षक अभियंता किंवा एमएसआरडीसीचा अभियंता उपस्थित नसल्याने मजूर कामगार कोणाचेही न ऐकता काम करतात. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

आणखी वाचा

Nitesh Rane
‘तुला संपवतो, घ्या रे याला’ म्हणत नितेश राणे आणि समर्थकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, शासकीय अधिकाऱ्याची तक्रार

Hasin Jahan appealed PM Narendra Modi
‘देशाचं नाव बदलून…’ मोहम्मद शमीच्या पत्नीचं पंतप्रधान मोदींना आवाहन

पुतणीच्या लग्नात सचिनने बांधला फेटा; पुण्यातील लग्न सोहळ्यातील फोटो पाहिलेत का?

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेनेच्या चिन्हाबाबतच्या एकनाथ शिंदे गटाविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णांकडून महत्त्वाचा निर्णय
मागील चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी बाहेरगावी गेलेल्या पर्यटकांची वाहने आणि त्याचवेळी बुधवारी कामावर निघालेल्या नोकरदार, विद्यार्थी वाहतुकीची वाहने गुरुवारी सकाळी सात वाजल्या पासून कल्याण-शिळफाटा रस्त्यावर पलावा चौक परिसरात समोरा समोर आली. ही वाहने पुढे जाण्यासाठी मार्ग काढत असताना पलावा चौका जवळील पुलाजवळ ‘एमएसआरडीसी’च्या ठेकेदाराने एका मार्गिकेत काँक्रीटीकरणाचे काम केले आहे. उड्डाण पुलानंतरच्या पोहच रस्त्यावरुन येजा करणारी वाहने एका मार्गिकेतून येजा करु लागल्याने कोंडीत भर पडली. त्यात पलावा, लोढा वसाहतीमधून बाहेर पडणारी वाहने मध्ये घुसल्याने कोंडीत आणखी भर पडली.

चार दिवसानंतर नोकरीवरील कामाचा पहिला दिवस असल्याने प्रत्येक दुचाकी, मोटार वाहन चालकाची कामावर जाण्याची घाई होती. त्यामुळे दुचाकी स्वार रस्ताकडेच्या सीमारेषेतून दगड, मातीमधून वाट काढत पुढे जात होते. अनेक मोटार चालक मध्ये वाहने घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. ही सगळी वाहने काटई नाका, काटई उड्डाण पूल, पलावा चौक भागात एकाचवेळी अडकून पडल्याने एकाही वाहनाला हालचाल करण्यास जागा राहिली नाही.

एकमेकांना मागे सारुन पुढे जाणाऱ्या वाहन चालकांनी सर्वाधिक वाहतूक कोंडी केली आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि त्यांचे पथक सकाळ सात वाजल्यापासून शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा, काटई नाका, पलावा चौक, देसई, पडले भागातील वाहन कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहनांचे नियोजन करण्यासाठी जागाच नसल्याने पोलिसांची दमछाक झाली.

Sort:  

Good job