शाळकरी मुलाच्या 'चंद्रा'नं अख्ख्या महाराष्ट्राला लावलंय वेड, सूर असा की अंगावर येतील शहारे, पाहा

in #daily2 years ago

viral-video-boy-singing.jpgमुंबई 17 सप्टेंबर 2022 : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यांपैकी काही व्हिडीओ हे इतके मनोरंजक असतात की ते पाहण्यात आपल्या तासनतास वेळ कसा निघून जातो, हे आपलं आपल्यालाच कळत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याने अख्ख्या महाराष्ट्राल वेड लावलं आहे.

हा व्हिडीओ एका शाळकरी मुलाचा आहे. ज्याचं गाणं तुमच्या कानावर पडताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही. हा मुलगा आपल्या वर्गात गाणं गताना दिसत आहे. हा मुलगा लावणी गात आहे. त्याच्या आवाजात अशी काही जादू आहे की तुम्ही त्याचं गाणं संपूर्ण ऐकण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही.

खरंतर चंद्रा या गाण्यानं आणि अभिनेत्री अमृता खानविलकरच्या गाण्यानं आधीच संपूर्ण महाराट्राला वेड लावलं होतं. त्यात आता या चिमुकल्यानं ज्या पद्धतीने गाणं गायलं आहे, ते देखील तुम्हाला मोहात पाडेल.
मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडीओमधील मुलाचं नाव जयेश खरे आहे आणि तो नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील करजगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे. कुठली पार्श्वभूमी नाही की कुठलं संगीताचं शिक्षण नाही, तरी देखील या मुलानं जे गायलं त्याला तोड नाही.

Sort:  

Plz like me my all post