तो' परत येतोय! मुकेश अंबानींनी खरेदी केला काळ गाजवणारा ब्रँड; ईशा अंबानींवर मोठी जबाबदारी

in #daily2 years ago

isha-and-mukesh-ambani-93918318.jpgमुंबई: पुढच्या काही महिन्यांत कोला बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात. रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कोला बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत. ८० आणि ९० च्या दशकात बाजार गाजवणारा कॅम्पा कोला पुन्हा एकदा बाजारात दिसणार आहे. ऑक्टोबरमध्ये कॅम्पा कोला बाजारात पुनरागमन करेल. रिलायन्सनं प्योर ड्रिंक समूहासोबत २२ कोटींचा करार करून कॅम्पा कोला ब्रँड खरेदी केला आहे.
१९७७ मध्ये कोकाकोलाला भारत सोडावा लागला. त्यामुळे भारतीय कोला बाजारात निर्माण झालेली पोकळी कॅम्पा कोलानं भरून काढली. कॅम्पा कोलानं एक काळ गाजवला. बाजारात आपली ओळख निर्माण केली. आता त्याच ब्रँडचं अधिग्रहण मुकेश अंबानींनी केलं आहे. रिलायन्स रिटेल या ब्रँडला रिलॉन्च करेल. रिलायन्स रिटेलचं नेतृत्त्व मुकेश अंबानी यांच्या कन्या ईशा अंबानी करतात.
रिलायन्स उद्योग एफएमसीजी क्षेत्रात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. त्याचसाठी रिलायन्सनं कॅम्प कोला ब्रँड खरेदी केला आहे. कधीकाळी बाजारात अग्रगण्य असलेला ब्रँड खरेदी करून रिलायन्सनं मोठा डाव टाकला आहे. त्यामुळे लवकरच कोला बाजारात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपर्यंत कॅम्पा कोला नव्या रुपात तीन फ्लेवरमध्ये बाजारात येऊ शकतो. कोलासोबतच लेमन आणि ऑरेंज फ्लेवर लॉन्च करण्यात येईल.