सोनाली फोगाटच्या मर्डरचा कट आधीच रचला; आरोपीचा मोठा खुलासा
पणजी : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट हिची गोव्यात हत्या करण्यात आल्याचं समोर आलं असून यासंदर्भात आरोपी सुधीर संगवान याने मोठा खुलासा केला आहे. गोव्यातील एका हॉटेलमध्ये तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या संगवान याला गोवा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.(Sonali Phogat Murder Case Latest Updates)
सोनाली फोगाट हिच्या हत्येची कबुली आरोपी सुधीर सांगवान याने दिली असून तिच्या हत्येचा कट आधीच रचला असल्याचं त्याने चौकशीदरम्यान सांगितलं आहे. सोनालीला शुटींग असल्याचं खोटं सांगत गोव्याला घेऊन आले आणि तिची हत्या करण्यात आल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.