गेल्या 24 तासात 14 कोरोना पॉझिटिव्ह

in #coronavirus2 years ago

Img_20200420_151638.jpg

यवतमाळ, दि 26 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यात दिग्रस तालुक्यातील 13 व बाहेर जिल्ह्यातील एका रूग्णांचा समावेश असून त्यात पाच महिला व नऊ पुरूष आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 425 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 411 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79124 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77277 झाली आहे. ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 40 व बाहेर जिल्ह्यात चार अशी एकूण 44 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 80 हजार 58 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख 934 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.99 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 3.29 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.
नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून पुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.