स्कुल ऑफ स्कॉलर्स येये योग आठवडा व आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

in #celebrate2 years ago

IMG-20220625-WA0044.jpg
प्रतिनिधी यवतमाळ

येथील स्कुल ऑफ स्कॉलर्स मध्ये दिनांक १६ ते २१ जून 2022 दरम्यान योग आठवडा साजरा करयात आला. त्यामध्ये विदयार्थ्यांना रोज योगाचे धडे देण्यात आले. विविध आसन, प्राणायम यासह योगाची कार्यशाळा, योग प्रश्नमंजूषा कार्यक्रम घेण्यात आला. याशिवाय स्कुल ऑफ स्कॉलर्स यवतमाळ येथे दि २१ जून ला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. संतोषी सरुळकर व संजय कोल्हे यांनी शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे धडे दिले. यावेळी कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य नरेन्द्रसिंग चौव्हाण, उपप्राचार्य रिना काळे, प्रशासकीय अधिकारी कृणाल वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पंकज शेलोटकर व आभार रोशना घुरडे यांनी मानले.