KKR vs LSG Live : डिकॉक - राहुलची दमदार सलामी

in #bengaluru2 years ago

मुंबई : आयपीएलच्या 66 व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. लखनौसाठी आजचा सामना आपला प्ले ऑफचा स्पॉट फिक्स करण्यासाठी महत्वाचा आहे. तर केकेआरसाठी देखील आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकून आपल्या प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी महत्वाचा आहे. गुणतालिकेचा विचार केला तर लखनौ सुपर जायंट हा 13 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर केकेआरने 13 पैकी 6 सामने जिंकून 12 गुण मिळवत गुणतालिकेत सहावे स्थान गाठवले आहे. केकेआरने आजचा सामना जिंकला तर केकेआर चौथ्या स्थानावर पोहचेल.