T20 World Cup : क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! टी20 क्रिकेटमधून हे खेळाडू घेणार निवृत्ती?

in #aurangabad2 years ago

टी20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंवर टांगती तलवार, सुनील गावसकर यांच्या वक्तव्याने खळबळSubscribe to updates
Sunil Gavaskar On Team India Senior Players: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचा टी20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup 2022) प्रवास संपला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) सेमीफायनल (Semi Final) गाठली खरी, पण फायनल गाठण्यात ते अपयशी ठरले. सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा 10 विकेटने पराभव करत फायनल गाठली. टीम इंडियाच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताचे महान क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. सुनील गावसकर यांनी केलेल्या दाव्यानुसार टीम इंडियातील काही सिनिअर खेळाडू (Team India Senior Players) निवृत्ती घेऊ शकतात.

COMMERCIAL BREAK

SCROLL TO CONTINUE READING
हे ही वाचा : T20 World Cup: सेमीफायनलमधल्या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर संपातले चाहते

गावसकर यांच्या वक्तव्याने खळबळ
सुनील गावसकर यांनी केलेल्या दाव्यानुसार रोहित शर्मा लवकरच टी20 संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होऊ शकतो. रोहित शर्माने कर्णधार पद सोडल्यानंतर संघाची धुरा अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपावली जाऊ शकते. आयपीएलमध्ये (IPL) कर्णधारपद स्विकारल्यानंतर हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) पहिल्याच प्रयत्नात जेतेपद मिळवून दिलं होतं. त्यामुळे टी20 संघाचा कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरू शकतो.