Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजही ऑरेंज अलर्ट

in #all2 years ago

rain_up.jpgकोल्हापूर : जिल्ह्यात उद्याही ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. त्यामुळे पावसाची रिपरिप कायम राहणार आहे. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजता राधानगरी धरणाचे ३, ५ आणि ६ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे खुले असून तेथून पाच हजार ८८४ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात रात्री आठपर्यंत ३७ बंधारे पाण्याखाली होते. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी रात्री आठच्या दरम्यान २७.७ फूट होती. पंचगंगेची इशारा पातळी ३९, तर ४३ फुटांवर धोका पातळी आहे. पंचगंगेची पाणीपातळी २४ तासांत सुमारे आठ फुटांनी, तर त्या दरम्यान, सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान केवळ दोन फुटांनी वाढली. छोट्या-मोठ्या १४ धरणांपैकी सहा धरणे शंभर टक्के भरली असून, उर्वरित ८८ ते ९९ टक्क्यांपर्यंत भरली आहेत. राधानगरी धरणात २३४.१६ दलघमी पाणीसाठा आहे.