Rain Update : सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार

in #all2 years ago

Untitled_4.jpgवैभववाडी : जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. पावसाचा जोर वाढत असून, जिल्ह्यात आज सकाळी दहापर्यत सरासरी ९०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने ११ तारखेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला. काल (ता. ६) जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. वैभववाडीत अवघ्या ४५ मिनिटांत ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती; परंतु दुपारी साडेतीनपासून विजांचा कडकडाट सुरू झाला.