रेशनधारकांनो खोटी माहिती दिल्यास ४२ रुपये दराने गव्हाची वसुली

in #all2 years ago

ration-card_202209880865.jpgअन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी निकषात बसत नसल्यास स्वत: बाहेर पडण्यासाठी ‘गिव्ह इट अप’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही खोट्या माहितीच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडून ४२ रुपये किलो या दराने गव्हाची, तर ३२ च्या दराने तांदळाची वसुली केली जाणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यात आतापर्यंत ५२२३ जणांनी रेशनवरील धान्याचा हक्क सोडला आहे.