झूम - तरुणाईसाठी यामाहा ‘एमटी १५’

in #all2 years ago

rftgy.jpgभारतात पारंपरिक दुचाकी म्हटल्यावर वर्तुळाकार किंवा चौकोनी हेडलाईट, सरळ लांबलचक सीट, साधी रचना किंवा डिझाईन आणि अशा दुचाकीवरून ठराविक वेग मर्यादेत होणारा प्रवास, हे सर्वसामान्य चित्र. याच्या नेमके उलटे चित्र हल्ली दुचाकी बाजारात दिसते. स्पोर्टिव्ह लुक असणाऱ्या दुचाकी बाजारात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यामाहा कंपनीने ‘एफ झेड’च्या धर्तीवर लाँच केलेली ‘एमटी १५’ ही दुचाकीही तिच्या आकर्षक दिसण्याने मोहून टाकते. समोरून हेडलाईटची रचना, टेलिस्कोपिकऐवजी दिलेले ‘यूएसडी फोर्क’ अर्थात सस्पेन्शन, आरामदायी आसन व्यवस्था हे तिची वैशिष्ट्ये. ‘एमटी १५’च्या राईडचा हा लेखाजोखा...