मुलीवर बलात्कार प्रकरणात न्याय मागण्यासाठी गेलेल्या आईवर पोलीसाने केला बलात्कार

in #all2 years ago

उत्तर प्रदेश मधील कन्नौज पोलिसांचा लाजीरवाना चेहरा लोकांसमोर आला आहे, कन्नौज मध्ये एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्याच्या तपासाची विचारपूस करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलेलल्या पिडीतेच्या आईवर पोलिस प्रभारीने बलात्कार केला. त्यानंतर कन्नौजच्या एसपींच्या आदेशानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकीच्या प्रभारीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.
ही घटना कन्नौज कोतवाली पोलिस स्टेशनच्या एका गावातील आहे, येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता.या प्रकरणाचा तपास कन्नौज शहरातील कोतवाली भागातील हाजी शरीफ चौकीचे प्रभारी अनुप कुमार मौर्य यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. मुलीला न्याय मिळवून देण्याच्या अश्वासाने चौकीच्या प्रभारीने पिडीताच्या आईला सरकारी बंगल्यात बोलवून तिच्यावर बलात्कार केला.RAPE.png

Sort:  

Please like me bro