एअर इंडियाच्या ताफ्यात वाढ; ३० अत्याधुनिक विमाने दाखल होणार

in #all2 years ago

79.jpgभारतातील प्रमुख विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने अत्याधुनिक ३० नवीन विमाने करार पद्धतीवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये २५ नॅरो-बॉडी आणि ५ बोइंग वार्इड-बॉडी विमानांचा समावेश आहे. नुकतीच यासंदर्भातील करारावर स्वाक्षरीसुद्धा करण्यात आल्याची माहिती एअर इंडिया कंपनीकडून देण्यात आली आहे. तोट्यात आलेल्या बहुचर्चित एअर इंडिया विमान सेवेचा ताबा केंद्र सरकारने टाटा समूहाकडे दिल्यानंतर टाटा समूहाकडून एअर इंडिया कंपनीतील विमानांच्या ताफ्यात वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे. लवकरच एअर इंडियाच्या विमान ताफ्यात ३० अत्याधुनिक विमानांची भर पडणार आहे. ही नवीन विमाने २०२२ च्या अखेरीस सेवेत दाखल होतील. त्यामुळे एअर इंडियाच्या विमान ताफ्यात २५ टक्क्यांनी वाढ होईल. एअर इंडियाच्या दीर्घकाळापासून उभ्या असलेल्या १० नॅरो-बॉडी आणि ६ वाइड-बॉडी विमानसेवा नुकत्याच पुन्हा सुरू झाल्या आहेत. टाटा समूहाने या वर्षाच्या सुरुवातीला एअर इंडियाचे अधिग्रहण केले.