सूर्यवंशी यांना भाजपची उमेदवारी

in #all2 years ago

bjpapa.jpgसांगली : स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्‍चित झाले आहे. उद्या ते अर्ज दाखल करतील. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अद्याप शांतता आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आघाडीकडून फिरोज पठाण यांचा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. भाजपचे ९, काँग्रेसचे ४, तर राष्ट्रवादीचे ३ असे स्थायीत बलाबल आहे. बुधवारी सभापतीची निवड होणार आहे. तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. दरम्यान, सभापतिपदासाठी भाजपकडून सूर्यवंशी यांच्यासोबतच अॅड. स्वाती शिंदे, प्रकाश ढंग, गजानन आलदर व संजय कुलकर्णी इच्छुक होते.