आता मोरपीस विक्रेत्यांवर करडी नजर

in #all2 years ago

esakal_new__33_.jpgनागपूर - पिकॉक सिटी म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या नागपूर शहरात मोरांच्या पिसांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोराचे पीस अथवा साहित्य विक्रीची कायदेशीर बाजू तपासण्याचे अधिकार वनविभागाला दिले आहेत. नैसर्गिक गळती झालेल्या मोरपिसांची विक्री करता येईल, अन्यथा वन अधिनियमानुसार संबंधिताला कारागृहाची हवा खावी लागेल, असे आदेश बजावण्यात आले आहेत.मोरपीस आणि साहित्य विक्रीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र ही मोरपिसे खऱ्या अर्थाने नैसर्गिक गळतीची आहेत किंवा नाही हे तपासणारी कोणतीही यंत्रणा वनविभागाकडे नाही. यापूर्वी मोरपिसांची विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आलेली आहे. मात्र, सर्वच मोरपिस हे राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून विक्रीसाठी आणल्याचे उघड झालेले आहे. तरीही अवैधरीत्या मोरांची शिकार करून मोरपिसांची विक्री केली जात असेल तर त्यावर वनविभागाकडून करडी नजर ठेवली जाईल असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my news.🙏🏻🙏🏻