मतदार ओळखपत्राला जोडा आधार क्रमांक

in #all2 years ago

Voter_Id_and_Aadhar_Card.jpgपुणे - मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत मतदारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.आधार जोडणीसाठी आवश्यक नमुना अर्ज क्रमांक ६ ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच, मतदारांना ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ईआरओ नेट, गरुड, एनव्हीएसपी व वोटर हेल्पलाइन मोबाईल ॲप या माध्यमांवरही उपलब्ध आहे. त्याचबरोबर मतदारसंघात छापील नमुना अर्ज क्रमांक ६ ब च्या छापील प्रतींचे वाटप करण्यात येणार आहे.