PUBG ने बनवली जोडी! 'Fighting' करताना अशी सुरू झाली Love Story

in #all2 years ago

ऑनलाईन गेम पबजी (PUBG) सर्वांनाच माहिती आहे. अनेक मुलं पबजीच्या आहारी गेल्याची प्रकरणे आपण रोज बघतो. मुळात पबजी हा एक बॅटल रॉयल गेम्स आहे. त्यामुळे या गेममध्ये सहसा लढाई दिसून येते. पण आम्ही जर तुम्हाला सांगितले कीBanner__11_.jpg पबजीने एक लव स्टोरी घडवून आणली तर.. नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय.असं म्हणातात प्रेमात कोणतीच सीमा नसते. प्रेमात सर्व सीमा ओलांडल्या जातात. याचाच प्रत्यय आलेला आहे एका ऑनलाईन आणि फेमस गेम मधून. हो, मध्य प्रदेशच्या रायसेन येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे उत्तराखंडच्या नैनीताल येथे राहणाऱ्या मुलीशी पबजी खेळताना पबजी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर जे काही झाले ते कोणत्या मुव्हीच्या कथेप्रमाणे होते. चला तर जाणून घेऊया.

हेही वाचा: PUBG हत्याकांडात नवा ट्विस्ट; आईच्या हत्येनंतर आरोपी मुलगा कोणाला भेटायला गेला होता?

अडीच वर्षापुर्वी योगेशनी शीतल नावाच्या मुलीसोबत पबजी गेम खेळताना मैत्री झाली. पबजी गेममध्ये तुम्ही समोरच्या खेळाडूला तोपर्यंत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता जोपर्यंत तुम्हाला त्याची यूजर आईडी माहिती असते. जर तुम्हाला यूजर आईडी माहिती नसेल तरी तुम्ही सरळ समोरच्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता.मैत्री झाल्यानंतर दोघे एकत्र खेळायचे. इन-गेम माइक्रोफोनचा वापर करत एकमेकांशी बोलायचे. आणि त्यामुळे ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. आणि एक दुसऱ्याचा नंबर त्यांनी एक्सचेंज केला. त्यानंतर त्यांनी whatsapp वर टेक्स्टिंग आणि व्हिडिओ कॉलिंग सुरू केली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते एकमेकांशी भेटले सुद्धा.