Iran Protest: इराणमध्ये हिजाबविरोधात हिंसक निदर्शने, अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद

in #all2 years ago

महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराण आता आगीत होरपळत आहे. इराणमध्ये हिजाबविरोधातील निदर्शनांना आता हिंसक वळण लागले आहे. हिजाब जाळण्यासाठी पेटवलेली आग आता इराणमधील अनेक शहरे जाळून टाकू शकते. हिजाबच्या विरोधात निषेध आणि आक्रमकता जास्त प्रमाणात पसरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी स्त्रिया हिजाब जाळत होत्या आणि आता लोक गोंधळ करून सरकारी मालमत्ता जाळण्याच्या प्रयत्न करत आहेत.इराणमधील अनेक शहरांमध्ये वाढता हिंसाचार पाहता लोकांनी अफवा टाळून हिंसक होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करावी लागली आहे.इराणमध्ये कमी-अधिक प्रमाणात निदर्शने होत आहेत. एके ठिकाणी आंदोलक बाहेर आले मोठ्या प्रमाणावर त्यांची गर्दी झाली. आंदोलकांनी सुरक्षारक्षकांना खूप मारहाण केली. त्यामध्ये दिवांदरेह शहरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या कुर्दिश प्रदेशाचा हा भाग आहे, जिथे हिजाबच्या विरोधात सर्वाधिक निदर्शने होत आहेत.Ankita_Khane__4_.jpg

Sort:  

You are Great!
& Best news updater