US Open 2022 : व्हीनस, ओसाका पहिल्याच फेरीत गारद

in #all2 years ago

न्यूयॉर्क : व्हीनस विल्यम्सचे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले. त्याचप्रमाणे माजी विजेती इमा राडूकानु, नाओमी ओसाका यांनीही परतीचा मार्ग धरला. जून महिन्यात ४२ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या आणि सात ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या व्हिनससाठी सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा फारशी आनंदाची राहिली नाही. पहिल्या फेरीच्या सामन्यात तिला बेल्जियमच्या २८ वर्षीय ॲलिसन वॅन वायतवँककडून ६-१, ७-६ (५) पराभूत व्हावे लागले. १९९७ मध्ये प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या व्हिनसने २००० व २००१ मध्ये येथे विजेतेपद मिळविले होते. यंदा तिचा या स्पर्धेतील २३ वा सहभाग होता. २०२० पर्यंत अमेरिकन ओपनमध्ये ती पहिल्या फेरीत कधीच पराभूत झाली नव्हती. ॲलिसनची लढत आता क्लारा बुरेलविरुद्ध होईल. क्लाराने विम्बल्डन विजेत्या एलेना रायबाकिनाला ६-४, ६-४ ने गारद केले.

Sort:  

Like kre

Please like my post follow me sir