Samantha Ruth Prabhu: समंथाला मिळाला पहिला हिंदी चित्रपट, साकारणार 'राजकुमारी'!

in #all2 years ago

Samantha Ruth Prabhu News: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारतातील आतापर्यतची सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून या मालिकेचे नाव घेतले जाते. या (Indian Web Serise News) मालिकेमुळेच समंथाचा घटस्फोट झाला अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समंथानं फॅमिली मॅनमधून हिंदी प्रेक्षकांच्या हदयाचा ठाव घेतला होता. त्यानंतर ती अल्लु अर्जुनच्या पुष्पामधूनही समोर आली. त्यातील तिच्या नृत्यानं प्रेक्षकांना घायाळ केले होते.समंथाच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी म्हणजे ती आता बॉलीवूडमध्ये येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ती या संधीची वाट पाहत होती. आतापर्यत केवळ वेगवेगळ्या मालिका आणि शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तिनं प्रेक्षकांना आपलेसं केलं आहे. मात्र समंथानं एका बिग बजेट चित्रपटातून समोर यावं अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांची होती. अखेर समंथाला अशी संधी मिळाल्याचे दिसून आले आहे