Salman Khan Threat Case : धमकी प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे; घराची सुरक्षा वाढवली

in #all2 years ago

Salman Khan Latest News ‘प्लॅन बी’अंतर्गत बॉलिवूड दबंग सलमान खानला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या प्रकरणाचा तपास (Investigation) आता वांद्रे पोलिसांकडून मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक चंदीगडला गेले आहे. दुसरीकडे सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. इमारतीच्या आवारात मुंबई पोलिस तैनात आहेत. तर खासगी सुरक्षा रक्षक इमारतीच्या बाहेर लक्ष ठेवून आहेत.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोल्डी ब्रार हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या प्लान बीचे नेतृत्व करीत होता. कारण, लॉरेन्स विश्नोई टोळीचा शार्प शूटर कपिल पंडित याला दिल्ली पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाईत भारत-नेपाळ सीमेवरून अलीकडेच अटक केली होती.