Rain Update : पुण्यात हलक्या पावसाची शक्यता

in #all2 years ago

पुणे : पुणे शहर आणि परिसरात पाऊस ओसरत असून पुढील आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील तीन दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पुणे शहरात पावसाचा जोर कमी झाला असून ऊन सावलीचा खेळ सुरूच आहे. रविवारी शहरात अधूनमधून ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होत पावसाच्या अत्यंत हलक्या सरींनी हजेरी लावली. शहरात ०.१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. तर कमाल तापमानात ही सरासरीच्या तुलनेत काहीशी घट पाहायला मिळाली. ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या गुरुवारपर्यंत (ता. २२) शहर व परिसरात विजांसह पावसाच्या अत्यंत हलक्‍या सरी अपेक्षित आहेत.Untitled_design__5_.jpg