Nagpur : कुटुंबीयांच्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाने केले विष प्राशन

in #all2 years ago

रामटेक : विवाह करण्यास कुटुंबीयांकडून होणाऱ्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाने उंदीर मारण्याचे विष प्राशन केले. यामध्ये प्रेयसीचा मृत्यू झाला तर प्रियकर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अश्विनी रामेश्वर उईके (वय २२, फुलझरी जंगली) असे मृत तरुणीचे नाव आहे तर अरुण सुखदास कोडवते (वय २२, रयतवाडी वडांबा) असे प्रियकराचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार अरुण सुखदास कोडवाते हा गवंडी काम करतो. तो फुलारी येथे कामावर जात होता. दोन वर्षांपूर्वी त्याची अश्विनीशी ओळख झाली. कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. एक सप्टेंबर रोजी ते दोघेही रयतवाडी येथे आले. दुसऱ्या दिवशी अश्विनीचे दोन भाऊ तिला रयतवाडी येथे भेटायला गेले. त्यांनी अश्विनीला घरी चालण्यास सांगितले. दोघांचेही विधीवत लग्न लावून देतो, असेही सांगितले.मात्र, अश्विनी भावांचे ऐकून घेण्यास तयार नव्हती. यानंतर भाऊ रागाने निघून गेल्याने अश्विनी व अरुण यांच्यात वाद झाला. दोघांनीही उंदीर मारण्याकरिता घरी आणलेले औषध प्राशन केले. त्यांच्या तोंडातून फेस निघत असल्याचे अरुणच्या आईच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली. शेजारच्यांनी त्या दोघांनाही देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मेडिकलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, सोमवारी अश्विनीची प्राणज्योत मालवली. अरुणची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी घोडके करीत आहेत.