शिक्षकांना वर्गात स्वत:चे फोटो लावण्याचे बंधन! पुढील टप्प्यात हजेरी होणार बायोमेट्रिक

in #all2 years ago

शिक्षकांना वर्गात स्वत:चे फोटो लावण्याचे बंधन! पुढील टप्प्यात हजेरी होणार सोलापूर : आपला वर्गशिक्षक कोण, कोणत्या विषयाला कोणते शिक्षक आहेत, त्याची माहिती मुलांना असावी आणि त्या शिक्षकांबद्दल मुलांमध्ये आदरभाव वाढावा, या हेतूने प्रत्येक वर्गात संबंधित शिक्षकांचे ए-फोर साईजमध्ये फोटो लावण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. पण, शिक्षकांनी स्वत:ची जबाबदारी दुसऱ्यांवर सोपवू नये, लहान-मोठ्या सुट्यांमध्ये (शाळेच्या वेळेत) वैयक्तिक कामांसाठी बाहेर जाऊ नये, हाही त्यामागील उद्देश असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.