अतिवेगाने साडेतीन वर्षांत ३३ हजार मृत्यू! दरवर्षी २.२५ कोटी वाहनचालकांकडून नियम पायदळी

in #all2 years ago

सोलापूर : शिवसंग्रमाचे अध्यक्ष विनायक मेटे व उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर ‘वाहनांचा वेग’ हे वाढते अपघात आणि मृत्यूचे प्रमुख कारण समोर आले आहे. साडेतीन वर्षांत अतिवेगाने ७६ हजार अपघातांमध्ये तब्बल ३३ हजार ६०४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. दुचाकीस्वार, वाहनांचा अतिवेग, लेनकटिंग, सिटबेल्ट नाही, धोकादायक माल तथा प्रवासी वाहतूक, अशा प्रमुख कारणांमुळे अपघाती मृत्यू वाढल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदविले आहे. २०१९ च्या तुलनेत मागील दीड वर्षांत अपघातांचे प्रमाण जवळपास आठ टक्क्यांनी वाढले आहे. दुसरीकडे २०१९-२० च्या तुलनेत अतिवेगाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सतराशेने वाढली आहे. दरवर्षी तब्बल सव्वादोन कोटी वाहनचालक वाहतूक नियम मोडतात. त्यात सिटबेल्ट, हेल्मेट नाही, लेनकटिंग (स्वत:ची लाईन सोडून दुसऱ्याच लाईनवरून वाहन चालवणे), अतिवेग आणि क्षमतेपेक्षा अधिक माल व प्रवासी, अशा वाहनचालकांचा समावेश असल्याचेही महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, अपघातानंतर अजूनही जखमींना वेळेत मदत मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. वाहनचालकांना पोलिसांची भीती वाटत असल्याने जखमींना अजूनही वेळेत मदत मिळत नाही आणि त्यामुळेही अनेकांचा मृत्यू झाला आहे.अतिवेगाचे अपघाती बळीसन अपघात मृत्यू२०१९ २०,०४५ ८,१७५ २०२० १९,४१९ ९,१५२ २०२१ २०,८६० ९,८२९२०२२ १५,८२२