झेडपी, महापालिका निवडणूक पुढे; नेत्यांसह त्यांच्या मुलांची ‘सिनेट’मध्ये उडी

in #all2 years ago

सोलापूर : जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींची मुदत संपूनही निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासकांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला, पण आता सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकाला मुदतवाढ दिल्याने निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे निवांत असलेले राजकीय नेते तथा नेत्यांची मुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची निवडणूक लढवीत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, तत्कालीन सिनेट सदस्य रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे व माजी महापौर मनोहर सपाटे यांची कन्या मंजुळा सपाटे यांनीदेखील ‘पदवीधर’मधून उमेदवारी दाखल केली आहे.
ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

झेडपी, महापालिका निवडणूक पुढे; नेत्यांसह त्यांच्या मुलांची ‘सिनेट’मध्ये उडी
Published on : 17 September 2022, 3:00 am

By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
झेडपी, महापालिका निवडणूक पुढे; नेत्यांसह त्यांच्या मुलांची ‘सिनेट’मध्ये उडी

सोलापूर : जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींची मुदत संपूनही निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासकांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला, पण आता सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकाला मुदतवाढ दिल्याने निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे निवांत असलेले राजकीय नेते तथा नेत्यांची मुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची निवडणूक लढवीत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, तत्कालीन सिनेट सदस्य रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे व माजी महापौर मनोहर सपाटे यांची कन्या मंजुळा सपाटे यांनीदेखील ‘पदवीधर’मधून उमेदवारी दाखल केली आहे.

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज आहे. त्यामुळे माजी झालेली राजकीय नेतेमंडळी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांत ठाण मांडून आहेत. पण, राजकारण करताना अनेकदा शैक्षणिक क्षेत्रातील ओळखी, अनुभवदेखील कामी येतो, हे स्पष्ट झाले आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवून राजकीय क्षेत्रात ताकद वाढविण्याची संधी सिनेट निवडणुकीतून उपलब्ध होते. हाच धागा पकडून राजकीय नेत्यांनी सिनेट निवडणुकीत उडी घेतली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या सून वैशाली साठे हे उमेदवार संस्थाचालक मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. या सिनेट निवडणुकीत संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ शिक्षक हे मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांत ‘सुटा’चेच वर्चस्व आहे. ‘सुटा’ने राजाभाऊ सरवदे व मंजुळा सपाटे यांना पदवीधरमधून संधी देत विद्यापीठात संघटनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.