ही तर चोरी आहे; धोनी असं साक्षीला का म्हणाला?

in #all2 years ago

MS Dhoni Wife Sakshi Video : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएल 2022 नंतर फारसा कुठे दिसलेला नाही. मात्र आता त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महेंद्रसिह धोनी आणि पत्नी साक्षी यांच्यात एक वादविवाद झालेला दाखवण्यात आला आहे. मात्र हा वादविवाद लुटूपुटूचा होता. साक्षी धोनी म्हणते की तुझे फॉलोअर्स माझ्यावर देखील प्रेम करतात.
ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

VIDEO : ही तर चोरी आहे; धोनी असं साक्षीला का म्हणाला?
Published on : 17 September 2022, 9:21 am

By
अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Wife Sakshi Video : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएल 2022 नंतर फारसा कुठे दिसलेला नाही. मात्र आता त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महेंद्रसिह धोनी आणि पत्नी साक्षी यांच्यात एक वादविवाद झालेला दाखवण्यात आला आहे. मात्र हा वादविवाद लुटूपुटूचा होता. साक्षी धोनी म्हणते की तुझे फॉलोअर्स माझ्यावर देखील प्रेम करतात.

हेही वाचा: Prithvi Shaw : शॉचा धुमधडाका! कसोटीत T20 च्या स्ट्राईक रेटने शतकी खेळी

महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनीचा हा लुटूपुटूच्या लाढाईचा व्हिडिओ धोनीच्या अधिकृत फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तसेही महेंद्रसिंह धोनीचा सोशल मीडियावरील वावर हा अत्यंत मर्यादित असतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडत असते. आताच्या या व्हिडिओत धोनी साक्षीला म्हणतो की तू हे जे करत आहेस ते सर्व तुझे फॉलोअर्स वाढवण्यासाठी करत आहेस. ही चोरी आहे.' यावर साक्षी धोनी प्रत्युत्तर देते की 'तुझे फॉलोअर्स माझ्यावर देखील प्रेम करतात. मी तुझा एक अविभाज्य घटक आहे बेबी.. स्विटी.'