आफगाणिस्तानात मशिदीबाहेर भीषण स्फोट! २० जणांचा मृत्यू

in #all2 years ago

Blast Outside Mosque in Afghanistan : अफगाणिस्तानच्या हेरात शहरात शुक्रवारच्या नमाजच्या वेळी मशिदीबाहेर मोठा स्फोट झाला. या स्फोटात मशिदीचे इमाम मारले गेल्याचे सांगितले जात आहे, तसेच सामान्य लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. मात्र, मृतांच्या संख्येला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरात शहरात एका मशिदीबाहेर झालेल्या स्फोटात तालिबान समर्थित हाय-प्रोफाइल इमाम आणि नागरिक ठार झाले आहेत. तालिबानी अधिकाऱ्यांनी स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात मशिदीचे मुजीबुर रहमान अन्सारी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.या स्फोटात मशिदीचे मौलवी मुजिह अल-रहमान अन्सारी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तालिबानच्या प्रवक्त्याने अधिकृतपणे हेरातमध्ये दोन स्फोट झाल्याची पुष्टी केली आहे. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 200 लोक जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.