काजोल विमानतळावर छायाचित्रकारांना पाहाताच धावली, म्हणाली...

in #all2 years ago

![esakal_new___2022_08_20T205220_243.jpg](काजोल शुक्रवारी मुंबई विमानतळावर होती. यादरम्यान तिच्या पापाराझीसोबत एक मजेदार संवाद समोर आला. काजोलला पाहाताच कॅमेरामन तिच्या समोर आले. या दरम्यान काजोल वेगाने चालायला लागली. त्यांच्यासोबत फोटोग्राफरही धावू लागले. काजोलसोबत तिचे सुरक्षारक्षक होते. सिक्युरिटीने कॅमेरामनला हटवण्याचाही प्रयत्न केला, त्याचवेळी काजोल हसत-हसत निघून गेली.)पोशाखावर नकारात्मक प्रतिक्रियाविमानतळावर काजोलला कॅमेऱ्यात कैद करणं हे फोटोग्राफर्सचं काम झालं आहे. या पूर्वीही ती धावताना दिसली आहे. पुन्हा एकदा असेच काहीसे घडले की काजोलचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काजोलने ब्लॅक मॅक्सी ड्रेसम परिधान केले होते. तिने काळे जॅकेट घातले होते आणि केस मोकळे होते. तिला पाहाताच कॅमेरामन समोर येताच काजोलने वेग पकडला. काजोलच्या सिक्युरिटीने पॅप्स काढायला सुरुवात केली. पॅप्स म्हणाले, काजोल पडेल. पण काजोल वेगाने चालत राहिली आणि म्हणाली, तुम्ही किती फिट आहात ते दाखवू.