संगणकीकरणामुळे पीककर्जाला गती

in #all2 years ago

Tuesday, October 11, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

संगणकीकरणामुळे पीककर्जाला गती
Published on : 10 October 2022, 8:10 pm

By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा वेळेवर व्हावा, तसेच गतिमानता आणि पारदर्शकता यावी, यासाठी राज्यात कृषी पतपुरवठा करणाऱ्या सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला १५३ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. देशात नवीन सहकार मंत्रालय अस्तित्वात आले. त्यावेळी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठ्यासाठी देशातील सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. या योजनेंतर्गत देशातील ६३ हजार सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यात राज्यातील १२ हजार सेवा सोसायट्यांचा समावेश आहे.crop_loan_akola.jpg