चंपाषष्टीला वांग्याचे भरीत आणि भाकरी का करतात ? याबद्दल तुम्हाला माहितीय का ?

in #all2 years ago

नाशिक : वांग्याचे भरीत आणि भाकरी हे तसं महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतील खाद्यपदार्थ. मात्र, वांग्याचे भरीत आणि भाकरी बनविण्यामागे काही खास वैशिष्ट्ये आहेत. विशेषतः चंपाषष्टीला करण्याची प्रथा आहे. याच काळात भरताचे वांगे देखील महागतात. सध्या बाजारात भारताच्या वांग्याला 60 ते 70 रुपये किलो दर आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा म्हणते मार्तंड भैरवाची चंपाषष्टीला मोठी यात्रा असते. पुण्यातील जेजूरीसह महाराष्ट्रातील जिथे-जिथे खंडोबाचे देवस्थान आहे तिथे चंपाषष्टीला खास पुजा-अर्चा आणि यात्रा असते. खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने चंपाषष्टीला घराघरात सुघट आणि तळी भरली जाते. त्याच दरम्यान भरताच्या वांग्याचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. परंतु, यामध्ये काही अख्खायिका सांगितल्या जातात. त्यात खंडोबा वांग्याचे भरीत प्रिय असल्याने त्याचा नैवेद्य केला जातो, आणि तीच प्रथा आजही सुरू आहे.bharit.jpg