आता whatsapp, FB, Insta वापरासाठी मोजावे लागणार पैसे; मेटाची नवीन धोरणं

in #all2 years ago

WhatsApp_Image_2022_09_06_at_5_43_17_PM.jpegसध्या सोशल मीडिया ॲप आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले आहे. त्यात व्हॉट्सॲप आघाडीवर आहे. क्वचीतच असे कोणीतरी असेल ज्याच्याकडे हे ॲप नाही. व्हॉट्सॲप हे सर्वात मोठे मेसेजिंग ॲप आहे. जगभरात ते वापरले जाते. तसाच वापर फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही सोशल मीडिया ॲपचा होतो. दरम्यान, आता यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. या सोशल अॅपसाठी आता युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. मेटा या तीन अॅप्ससाठी आता सशुल्क सेवा आणणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनी नवीन उत्पादन संस्था स्थापन करत आहे.

कोण आहे मेटा?काही काळापूर्वी तीनही अॅप्स एकत्र करून एक कंपनी स्थापन करण्यात आली होती. ज्याचे नाव मेटा होते. आता मेटा कंपनी स्वतः व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकची अंमलबजावणी आणि नियंत्रण करते. याचा अर्थ मेटा काही पैसे घेऊन वापरकर्त्यांना प्रगत सुविधा देणार आहे. यासाठी कंपनी एक नवीन उत्पादन संस्था स्थापन करत आहे, जी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर सशुल्क फीचर्ससाठी काम करणार आहे. या युनिटच्या प्रमुख प्रतिति रॉय चौधरी असतील, त्या यापूर्वी मेटाच्या हेड ऑफ रिसर्च (Head of Research) प्रमुख होत्या.