Jacquline fernandiz: जॅकलीनला कपड्यांसाठी दिले तीन कोटी! नवा खुलासा

in #all2 years ago

1 (12).jpgSukesh chandrashekhar case: बॉलीवूडची अभिनेत्री जॅकलीन ही भलत्याच संकटात सापडली आहे. तिच्यावर ईडीची चौकशी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिला ईडीनं बोलावणं धाडून चौकशी केली होती. हजारो कोटींचा गैरव्यवहार करणारा महाठग सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनचे मैत्रीचे संबंध होते. तिनं त्याच्याकडून महागड्या वस्तुंचा स्वीकार केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केवळ जॅकलीनच नाहीतर तिची बहिण आणि आई वडील यांना देखील सुकेशनं महागड्या वस्तु पाठवल्याचे दिसून आले आहे.